मुंबई : साताऱ्यातील फलटण येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली, ते प्रकरण अजूनही तापलं आहे. त्या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटू लिहून दोघांची नावे नमूद केली, त्यांना अटकही करण्यात आली. मात्र फलटणमधील डॉक्टर मि  हलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनानंकडून काम बंद आंदोलन केलं जात आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांचा आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे. काम बंद आंदोलनामुळ आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
दरम्यान डॉ. संपदा मुंडे प्रकरणी मुंबईतील नायर रुग्णालयात डॉक्टर आक्रमक झाले असून ओपीडी पूर्णपणे बंद करत रुग्णालय परिसरात आंदोलन सुरू केले आहे. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थीने आंदोलन सुरू केले. बेटी पडी पर बची नहीं ङ्गङ्घनो सेफ्टी, नो सर्विस!फफ अश्या आशयाचे पोस्टर हातात घेत रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत.
गेट नंबर 1 परिसरात नायर मार्ट संघटनेकडून आंदोलन सुरू असून ङ्गङ्घडॉ. मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजेफफ अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणात रिटायर्ड न्यायाधीश आणि महिला सदस्याचा समावेश करत एसआयटी नेमावीअशी डॉक्टरांची मागणी आहे. संपदा मुंडे हिच्या कुटुंबाला 5 कोटींची मदत, जलदगती कोर्टात सुनावणी, आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करावा अशा मागण्याही आहेत. आंदोलन सुरू असल्याने रुग्णालय परिसरात ओपीडी सेवा ठप्प झाली आहे, फक्त इमर्जन्सी विभाग सुरू असून त्यामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे. आज फक्त ओपीडी सेवा बंद, पण न्याय न मिळाल्यास उद्या पासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करू असा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला असून प्रशासनावर डॉक्टरांचा रोष दिसून येत आहे.
गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही : सुषमा अंधारे
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती (एसआयटी) नेमल्याचे वृत्त खोटे आहे. राज्य सरकारने याप्रकरणात केवळ देरखेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक केली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. सुषमा अंधारे सोमवारी फलटण पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणाची माहिती घेणार आहेत. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्डचं काम बंद आंदोलन
डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू होऊन आठ दिवस उलटून गेले आहे. असे असतानाही अजूनही या प्रकरणी न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी डॉक्टर एकवटले असून आज सकाळी घाटी रुग्णालयात मार्ड संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
डॉ. मुंडे यांच्या मृत्यूने डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इतकेच नव्हे तर डॉक्टरांना न्याय मिळणे आवश्यक आहे. डॉक्टरांना सुरक्षित वाटावे अशी यंत्रणा अजूनही उभी झालेली नाही. याचा परिणाम डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागत असल्याची खंतही आता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. डॉ. संपदा मुंडे यांना अजूनही न्याय मिळालेले नाही. त्यांना न्याय मिळावा. अशी मागणी आज मार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आली. आज सकाळी घाटी रुग्णालयात डॉक्टरांना न्याय द्या अशा घोषणानी रुग्णालय दणाणून गेले. यावेळी डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त करून डॉ. संपदा मुंडे यांचे प्रकरण जलद न्यायालयात खटला चालवा आणि त्वरित न्याय द्यावा. अशी मागणी मार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी मार्ड छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष डॉ. चैतन्य ढावले, मार्ड सेंट्रलचे सचिव स्वप्नील केंद्रे, डॉ. श्रावणी कदरे, डॉ. स्नेहा गुणाले, डॉ. गौतम कुमनानी, डॉ. अलिशा निकम सह आदी डॉक्टर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार
जोपर्यंत डॉ. मुंडे यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी खटला जलद न्यायालयात चालवावा. अशी मागणी मार्डच्या वतीने करण्यात येत असल्याचे मार्ड संघटना अध्यक्ष डॉ. चैतन्य ढवाले यांनी स्पष्ट केले.